शिक्षणमंत्री केसरकर:आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
ओरोस ता.१०-:
अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थी कमी होत आहेत. कारण पालक इंग्रजी माध्यमाच्या प्राधान्य देत आहेत. परंतु इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असली तरी ती संभाषण साधण्यासाठी आहे. जगातील केवळ पाच देशात इंग्रजी भाषा आहे. त्यामुळे इंग्रजी म्हणजे सर्वकाही नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत शिक्षण घेवून सुद्धा जगाच्या पाठीवर कुठेही राज्य करता येते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना केले.
सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आज पार पडला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. यावेळी आ निरंजन डावखरे, प्रशासक प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विशाल तनपुरे, संजय कापडणीस, राजू राऊळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, दादा साईल, जयप्रकाश परब, वासुदेव नाईक, विजय चव्हाण, वासुदेव नाईक, अरुण चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांच्यासह शिक्षक संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०२३ साठी जिल्ह्यातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी देवगड – दीपक तानाजी डवर, उपशिक्षक (सौंदाळे बाऊलवडी), दोडामार्ग – संतोष ज्ञानेश्वर गवस, उपशिक्षक (झोळंबे), कणकवली – विद्याधर पांडुरंग पाटील, उपशिक्षक (घोणसरी नं ५), कुडाळ – पंढरीनाथ अनंत तेंडोलकर, पदवीधर शिक्षक (अणाव दाभाचीवाडी), मालवण – दिपक केशव गोसावी, उपशिक्षक (धामापूर बौध्दवाडी), सावंतवाडी – अरविंद नारायण सरनोबत, उपशिक्षक (माडखोल नं २), वैभववाडी – संतोष यशवंत मोहिते, उपशिक्षक (बालभवन विद्यामंदिर मौदे) तर वेंगुर्ला – शामल शंकर मांजरेकर – पिळणकर, उपशिक्षिका (केंद्र शाळा वायंगणी सुरंगपाणी) या शिक्षकांची निवड करण्यात आली होती. त्यांना आज पालकमंत्री चव्हाण, शिक्षणमंत्री केसरकर यांच्याहस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.