पालकमंत्री शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण

ओरोस ता.१०-:

जिल्ह्यातील सात ग्रामसेवक, एक ग्रामविकास अधिकारी आणि एक ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांचा २०२१-२२ या आर्थिक वर्षात सर्वोत्कृष्ट काम केल्याने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देवून पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.


येथील शरद कृषी भवन सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर आ निरंजन डावखरे, प्रशासक प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, राजू राऊळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, दादा साईल, गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, जयप्रकाश परब, वासुदेव नाईक, विजय चव्हाण, वासुदेव नाईक, अरुण चव्हाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यामध्ये ग्रामसेवक मालवण मधून प्रमोद निकम, देवगड मधून उमरअली मुल्लानी, कणकवली मधून मंगला बिलकुले, दोडामार्ग मधून कैलास राठोड, कुडाळ मधून महादेव वालावलकर, वेंगुर्ला मधून गर्कळ, वैभववाडी मधून नयना गुरखे, सावंतवाडी मधून ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव आणि कणकवली मधून ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल, श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.

You cannot copy content of this page