मंत्री केसरकर यांनी केले स्वागत:
ग्रामस्थांसह अनेकांनी तालुक्यातील घेतला शिवसेनेचा झेंडा हाती
⚡सावंतवाडी ता.१०-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक यांच्यासह तेथील ग्रामस्थांनी आज शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला त्याशिवाय विधानसभा मतदारसंघातील अनेकांनी मंत्री केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. शिवसेनेत स्वागत करताना योग्य तो मानसन्मान सर्वांना देण्यात येईल असे आश्वासन मंत्री केसरकर यांनी दिले.
धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक या गाव पॅनल च्या माध्यमातून सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मतदार संघातील होणारी विकास कामे लक्षात घेता धाकोरे गावाचा विकासात्मक विचार करून त्यांनी आज गावातील प्रमुख कार्यकर्त्यांसह मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यामध्ये भारती मुळीक सुधीर मुळीक योगराज मुळीक शंकर मुळीक रवींद्र मुळीक भाई मुळीक सागर मुळीक अशोक मुळीक निलेश मुळीक विठ्ठल मुळीक रिया मुळीक बाळकृष्ण मुळीक यांचा समावेश आहे.