पालकमंत्री चव्हाण, शिक्षणमंत्री केसरकर यांनी केला सत्कार..
ओरोस ता.१०-:
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१९-२० मध्ये कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविलेल्या देवगड तालुक्यातील बापार्ड आणि २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्राम पंचायतीचा सत्कार पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते करण्यात आला.
सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आज पार पडला. जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. यावेळी आ निरंजन डावखरे, प्रशासक प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विशाल तनपुरे, संजय कापडणीस, राजू राऊळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, दादा साईल, जयप्रकाश परब, वासुदेव नाईक, विजय चव्हाण, वासुदेव नाईक, अरुण चव्हाण, जिल्हा पाणी व स्वच्छता विभगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर आदी उपस्थित होते.