सायन्स मॉडेल मेकिंग स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या नारायण मांजरेकर याचा राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक

*⚡सावंतवाडी : *सहदेव राऊळ :* पुणे येथे घेण्यात आलेल्या नॅशनल स्टीम ( मिनी सायन्स)चॅलेंज २०२२- २०२३ राज्यस्तरावरील स्पर्धेत मॉडेल मेकिंग यात मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या कु. नारायण विद्याधर मांजरेकर या विद्यार्थ्याचा राष्ट्रिय स्तरावर द्वितीय क्रमांक आला.
या स्पर्धेसाठी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेतील लिपिक श्री गोविंद कानसे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय संस्थेचे अध्यक्ष श्री शिवराम मळगावकर, सचिव राजाराम राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, संस्था सदस्य श्री. केळुसकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर राऊळ, कायदेविषयक सल्लागार अँड वीरेश राऊळ, शिक्षण सल्लागार श्री. वैजनाथ देवण, शाळेचे मुख्याध्यापक श्री मारुती फाले, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष अभिनंदन केले.

You cannot copy content of this page