रविद्र चव्हाण; बांदा येथे राजन तेली पुरस्कृत भाजप दहीहंडीचे थाटात उद्घाटन
⚡बांदा ता.०९-: राज्यात हिंदू सणांवर लादलेल्या अटी शर्तीना शिथीलता देण्याचे काम शिंदे भाजपा सरकारने सत्ता परिवर्तन होताच सर्वप्रथम केले. हिंदू सण आणि सणांची व्यवस्था करण्यासोबत काय बदल आवश्यक आहेत ते सर्व करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी बांदा येथे केले. माजी आमदार राजन तेली यांच्या दहीहंडी उत्सवात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी त्यांच्या हस्ते दीपप्रज्वल करून या दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले.
यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, बांदा सरपंच अर्चना नाईक, माजगाव सरपंच अर्चना सावंत, बांदा उपसरपंच जावेद खतीब माजी नगरसेवक आनंद नेवगी, प्रथमेश तेली, अजय सावंत, गुरु सावंत, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, आदी पदाधिकारी मोठे संख्येने उपस्थित आहे.

यावेळी रवींद्र चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की आपण आज हा जो दहीहंडी उत्सव गेले चार दिवस दिवस राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करत असून ते पाहून येणाऱ्या काळात शिंदे- फडणवीस सरकार हा दहीहंडी उत्सव एक सप्ताह म्हणून साजरा होईल असे वातावरण सध्या राज्यात निर्माण झाले. एक पॉझिटिव्ह उत्साह या हिंदू सणांमध्ये दिसून येत असल्याचं देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान एखादे सण साजरे करणे हे काय सहज शक्य होत नाही आज जे सर्वजण एकत्र येऊन हा सण ज्या अर्थाने साजरा करतात याच्यात तरुणातील उत्साह देखील दिसून येत असल्याचे देखील यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण बोलताना म्हणाले. दरम्यान राजन तेली व त्यांच्या सहकाऱ्यांनी जे आज नियोजन केले व तरुणांमध्ये उत्साह निर्माण करून खेळांना जे महत्व मिळायला पाहिजे तरुणांमध्ये एक वेगळा पद्धतीने आकर्षण असले पाहिजे जे मैदानी खेळ शरीर कमवण्याची एक वेगळी स्पर्धा या निमित्ताने होणे हे गरजेचे आहे. व्यसन आणि व्यसनांपासून तरुण आणि तरुणाई ही लांब राहिली पाहिजे यासाठी मैदानी खेळ असणारा महत्त्व काय या मैदानी खेळांमधून जाणवत असतो अशा उपक्रमाच्या माध्यमातून एक वेगळा पायंडा सिंधुदुर्ग मध्ये सुरू झालाय याचा साक्षीदार मी आहे आहे याचा मला सार्थ अभिमान असल्याचं प्रतिपादन देखील चव्हाण यांनी यावेळी व्यासपीठावर केले.
दरम्यान दहीहंडी पथकाने मोठ्या संख्येने हजेरी लावून नागरिकांनी देखील मोठी गर्दी पाहण्यासाठी केली होती.