देवगडात पाणी समस्येबाबत नागरिकांतून संताप…

शहरात पाणी समस्येचा नागरिकांना करावा लागतो सामना, आठवड्याने होते पाणी पुरवठा..

देवगड
देवगड शहरात होत असलेल्या खंडित पाणीपुरवठा हा सुमारे ७ ते ८ दिवस खंडित करून केला जात असल्याने देवगड शहरवासीयांना पाहण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मध्यतरीच्या काळात हा पाणी पुरवठ्या ३ ते ४ दिवसांनी होत होता.सद्यस्थिती पुरेसा पाऊस होऊन देखील भीषण पाणी समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत कोणत्याही प्रकारचा स्पष्ट खुलासा नगरपंचायत प्रशासन अथवा अधिकारी तसेच सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकाकडून केला जात नसल्याने नागरिकांमध्ये पाणी समस्येबाबत संताप व्यक्त होत आहे.
प्राथमिक स्तरावर शुक्रवारी देवगड येथील नळग्राहक शिष्टमंडळाने देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू आणि कर निर्धारण अधिकारी उमेश स्वामी यांची भेट घेऊन या अनियमित व खंडित पाणीपुरवठा बाबत सविस्तर चर्चा केली. या अनुषंगाने या चर्चेत प्रामुख्याने एक दिवस आड सुरू असलेला पाणीपुरवठा ७ ते ८ दिवसांनी होण्याची कारणे देण्यात यावी. त्याचबरोबर थकीत पाणीपट्टी व लाईट बिलाच्या च्या अनुषंगाने खंडित पाणी पुरवठा होत असेल तर येणाऱ्या समस्यांची ही माहिती देण्यात यावी. शिरगाव येथून होणारा पाणीपुरवठा कोणत्या कारणास्तव खंडित झाला आहे. याची सविस्तर माहिती देण्यात यावी ,एक दिवस आड पाणीपुरवठा देवगड जामसंडे, वासियांना केव्हापासून सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे विचारणा करण्यात येऊन देवगड जामसंडे नियोजित नळपाणी योजनेची सद्यस्थिती व त्यावर कोणती कार्यवाही सुरू आहे .
याबाबत या शिष्टमंडळाने विचारणा करून ही माहिती तात्काळ येत्या दोन दिवसात देण्यात यावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे .अन्यथा देवगड मधील गंभीर पाणी समस्येबाबत तीव्र आंदोलन ग्राहकां समवेत छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. या शिष्टमंडळात नळ ग्राहक उल्हास मणचेकर, चंद्रकांत पाळेकर ,दयानंद मांगले, शैलेश कदम व अन्य ग्राहक उपस्थित होते. या अनुषंगाने आवश्यक ती लेखी माहिती चार दिवसात देण्यात येईल व देवगड जामसंडे भागातील नागरिकांना लवकरात लवकर एक ते दोन दिवस आड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी दिले.

You cannot copy content of this page