*💫सावंतवाडी दि.०६-:* खासकिलवाडा प्रभाग क्रमांक ६ येथे लहान मुलांच्या पार पडलेल्या किल्ले स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृती तसेच सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मनसे कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, युवती अध्यक्ष ललिता नाईक, उपशहराध्यक्ष देवेंद्र कदम, शुभम सावंत आदी उपस्थित होते. पुढील वर्षीही संपूर्ण सावंतवाडी शहर मर्यादीत किल्ला स्पर्धा आयोजित केली जाईल, असे आशिष सुभेदार यांनी सांगितले.
खासकिलवाडा येथील किल्ले स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा आशिष सुभेदार यांच्या हस्ते गौरव…
