वृद्ध कलाकार मानधन शिफारस समितीवर सौरभ पाटकर यांची निवड

⚡कुडाळ ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन शिफारस समिती पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शिफारसीनुसार उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी गठीत केली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी भाजपा कणकवली ग्रामीणचे मंडल अध्यक्षतथा सुप्रसिद्ध डबलबारी भजनी बुवा संतोष कानडे यांची निवड करण्यात आली. तर समिती सदस्य म्हणून नेरुरचे सुपुत्र आयडीयल इंग्लिश स्कूल नेरुरचे मुख्याध्यापक तथा दशावतार लोककला अभ्यासक, सौरभ पाटकर यांची निवड करण्यात आली आहे. अनेक दशावतार कलाकारांना मार्गदर्शक असणाऱ्या अशा व्यासंगी व्यक्तिमत्त्वाची निवड समितीवर झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page