बांदा केंद्रशाळेत पर्यावरण पूरक राख्यांची निर्मिती

⚡बांदा ता.२९-: रक्षाबंधन हा बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक समजला जाणारा महत्त्वपूर्ण सण आहे या सणाच्या निमित्ताने बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधत असते बाजारात विविध प्रकारच्या राख्या विकत मिळत असतात पण बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा यासाठी पर्यावरणपूरक राख्या तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांनी कडधान्य,तृरधान्य,बिया, मसाल्याचे पदार्थ,पाने‌-फुले इत्यादी पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करून‌ आकर्षण राख्या बनविल्या आहेत‌. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे -सर्वोत्तम विधी वसाने,प्रथम दुर्वा नाटेकर द्वितीय -तनिष्का देसाई ,जुई हर्डीकर तृतीय -वेदांत चौगुले व काव्या चव्हाण,चतुर्थ-अनुष्का दळवी व आदित्य राणसिंग,पाचवा -भद्र मोर्ये व तपस्या कुबडे उत्तेजनार्थ -गौरी तर्पे,मनस्वी कुबडे, आरुष बांदेकर,दशरथ‌ कोरगावकर,भाव्यांश वझरकर, गुरूनाथ कर्पे,सदानंद‌ केसरकर, शंकर गवस,मानसी मौर्या, श्रवण कोरगावकर, सर्वज्ञ वराडकर, वेदांत सातोसकर,विहान गवस,रूही तेवढे,मंथन गावडे,हेजल‌कारेकर, रिया गवस,गौरवी शेर्लेकर,स्वरा विर्नोडकर, शुभंकर चौकेकर,समर्थ, पाटील,स्वरा कदम सुमन मौर्या या विद्यार्थ्यांनी सुयश‌ मिळविले. या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन मिळाले.

You cannot copy content of this page