परशुराम उपरकर ; राजकीय दृष्ठा एकमेकांना संपविण्याचे काम..
सावंतवाडी ता.२८-: जिल्ह्यात भाजपचे दोन तिन गट असून ते एकमेकांना संपवण्याच काम करत असल्यानेच भाजपच्या काही नेत्यांना मोर्चा काढून आपले वरिष्ठ नेते काम करत नसल्याचे दाखवण्यात आले असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केला.
दरम्यान राणेंनी कोकणातील टोलमुक्त करू असे आश्वासन जनतेला दिले होते मात्र ते अद्याप झाले नसून रस्ता पूर्ण होणे आधीच टोल वसुली सुरू आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार,प्रकाश साटेलकर,मंदार नाईक,निलेश देसाई,
विजय जांभळे,अभि पेंडणेकर,
सागर येडगे,रमेश शेळके,
प्रमोद गावडे,स्वप्नील जाधव, आदी उपस्थित होते.
