बबन साळगावकर: मंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ लक्ष घालावे
सावंतवाडी ता.२३-:येथील पालिकेच्या कंत्राटी कामगारांचा पी.एफ हडप करणाऱ्या त्या संबंधित ठेकेदारावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. दरम्यान कामगार नसल्याने त्यांना हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे या प्रश्नी मंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
