Headlines

एसआयटी ची स्पेशल इन्व्हेस्टिंगेटिग टीम आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नेमणूक करा

*अतुल रावराणे यांची पत्रकार परिषदेत मागणी*

कणकवली : मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर कासार्डेसह परिसरातील अवैध सिलिका मायनिंग उत्खननावर कारवाई सुरू झाली आहे.मात्र बेकायदेशीर उत्खननच नव्हे तर शासनाच्या दस्तऐवजाशी छेडछाड करण्यात आली आहे. एसआयटी ची स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली न्यायालयाच्या निरीक्षणाखाली नेमावी अशी मागणी शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेत केली. या सिलिका माफियांवर समूळ कारवाई होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असून प्रसंगी न्यायालयात जाऊ असा निर्धारही अतुल रावराणे यांनी व्यक्त केला. मागील 5 वर्षे हा कासार्डेसह पियाळी आदी गावांत अवैध सिलिका उत्खनन सुरू आहे. केवळ सिलिका वाहतूक करणारे ट्रक पकडून दंड करणे पुरेसे नाही. अवैध सिलिका मायनिंग त्वरित बंद करून त्यांची लॉकबुक तपासणी गरजेचे आहे. ट्रेडिंग च्या ट्रान्झिट पास च्या नावाखाली सिलिका वाहतूक केली जाते. किमान 600 गाड्या दररोज सिलिका वाहतूक करतात. वाहतूक पास हे नावाला दाखवले जातात. बारकोड स्कॅन केल्याशिवाय पासची वैधता समजत नाही. सिलिका उत्खनन होत असलेला भाग हा इको सेनसिटीव्ह, बफर झोन आहे. आचिरणेत तर रेल्वे लाईनपासून 40 मीटर वर सिलिका माईन आहे. सिलिका माफियानी पळवाटा शोधून करोडो रुपयांचा घोटाळा केला. ट्रकमध्ये 20 ते 25 टन सिलिका असते, मात्र वाहतूक पास केवळ 10 टन चा असतो. सिलिका खरेदीदार आणि विक्रेता यांच्या रेकॉर्ड ची तपासणी केल्यास सत्य उजेडात येईल. शासनाचे बनावट रबर स्टॅम्प आणि शिक्के बनवणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा सिलिका माफियांवर फौजदारी कारवाई आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी मशिनरी लावून सिलिका उत्खनन होते. यात महसूल अधिकारी सामील असल्याचा आरोपही रावराणे यांनी केला . सिलिका माफियांना भीतीच नाहीशी झाली आहे. तेलगी च्या स्टॅम्प पेपर पेक्षा कासार्डेतील सिलिका घोटाळा मोठा आहे. खासदार विनायक राऊत यांचे अजूनही अवैध सिलिका मायनिंगवर कडक कारवाई झालेली नसल्याकडे लक्ष वेधले आहे. शासनाच्या दस्तऐवजाशी केलेली खाडाखोड हा गंभीर गुन्हा असून फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निवेदन खासदार राऊत यांच्याकडे दिले आहे. याबाबत पुन्हा लवकरच मुख्यमंत्री ठाकरे यांची याबाबत भेट घेणार असल्याचेही रावराणे यांनी सांगितले. प्रसंगी न्यायालयात जाण्याचा निर्धारही रावराणे यांनी बोलून दाखवला.यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, राजू राठोड, सुनील पारकर, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page