खादी ग्रामोद्योग कर्ज प्रकरणांची प्रलंबित सबसिडीची रक्कम द्या…

आ. वैभव नाईक:खादी ग्रामोद्योगचे सभापती रविंद्र साठे यांचे प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश

कणकवली 22 ऑगस्ट (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांची कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील खादी भवन येथे भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी खादी ग्रामोद्योग अंतर्गत विविध बँकांकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणांतील प्रलंबित सबसिडीची रक्कम लाभार्थ्यांना अद्यापही मिळाली नाही. नियमितपणे कर्जाची परतफेड करून देखील सबसिडी मिळाली नाही.त्यामुळे नागरिकांना नवीन कर्ज प्रकरणे करता येत नाहीत त्याचबरोबर बँक देखील एनओसी देत नाहीत. याकडे आ. वैभव नाईक यांनी रविंद्र साठे यांचे लक्ष वेधत कर्ज प्रकरणाची प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी अशी विनंती केली. त्यावर रविंद्र साठे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकरात लवकर जमा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page