माजगांव ग्रंथालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी
२९ रोजी प्रश्न मंजुषा स्पर्धा

⚡सावंतवाडी ता.२२-: माजगांव मनविकास ग्रंथालय मंडळ माजगांव यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांच्या गुणांना प्रोत्साहन मिळून वाचन संस्कृतीची जोपासना होण्यासाठी मंगळवार दिनांक २९ रोजी दुपारी ३:३० वाजता वाचनाच्या सभागृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे.

स्पर्धा शालेय गट इयत्ता ५वी ते ७वी व माध्यमिक गट आठवी ते दहावी अशा दोन विभागत घेण्यात येईल. स्पर्धेचा विषय सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा या विषयाअंतर्गत असून प्रत्येक गटासाठी २५ गुण (२५ प्रश्न) असून वेळ प्रत्येक स्पर्धकासाठी २ मिनिट राहिल. प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ एक काढण्यात येतील. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक देण्यात येतील. हि स्पर्धा माजगांव मर्यादित असून स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावे ग्रंथालयाच्या कार्यालयीन वेळेत आपल्या शालेय तपशिलासहित द्यावी. स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण स्पर्धा संपल्यावर लगेचच जाहिर करण्यात येईल. सर्व विद्यार्थी स्पर्धेकांनी याचा लाभ घ्यावा, असे आव्हाहन अध्यक्ष माजगांव ग्रंथालय माजगांव यांनी कळविले आहे.

You cannot copy content of this page