बंदर जेटी येथे सलग नवव्या वर्षी आयोजन
मालवण दि प्रतिनिधी
मालवणच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने यावर्षीही बुधवार ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे नववी जिल्हास्तरीय महिला नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या महिलेला सोन्या चांदीने मढवलेला नारळ, सोन्याचा कॉईन, सोन्याची नथ तर उपविजेत्या स्पर्धकास सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ यांसह इतर विजेत्यांना ही आकर्षक पारितोषिके दिले जाणार आहेत
गेली ८ वर्षे माजी बांधकाम सभापती यतीन खोत आणि शिल्पा खोत मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्यदिव्य आयोजनातील जिल्हास्तरीय महिला नारळ लढवणे स्पर्धा यावर्षीही आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्राप्त स्पर्धकाला सोन्याची नथ तसेच अंतिम फेरीत पोहचलेल्या स्पर्धकांना चांदीची भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाणार आहे. यासह स्पर्धक व प्रेक्षक यांसाठी लकी ड्रॉ कुपन ठेवण्यात आले असून विजेत्यांना चांदीच्या भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.
स्पर्धेसाठी महिलांना नारळ आयोजकांच्या वतीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. उपांत्य फेरीत दाखल होणाऱ्या चार स्पर्धकांना पुन्हा नव्याने प्रत्येकी पाच नारळ देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहिती व नावनोंदणीसाठी सौ. शिल्पा खोत मोबा : 890103330, 9422584641, सौ. प्रतिभा चव्हाण मोबा : 9307294569, ज्योती तोडणकर मोबा 8956036393, तन्वी भगत मोबा : 8104500843 यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील महिला, मुली यांनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग दर्शवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे खास आकर्षण
तुषार योगेश आर्टस् निर्मित झी मराठी गाव गाता गजाली फेम आर्टिस्ट महाबली हनुमान आणि सोबत १२ फूट उंच कोंबडा हे या वर्षी स्पर्धेत खास आकर्षण असणार आहे.
सोन्या चांदीचा नारळ व अन्य बक्षिसांचे २८ ऑगस्टला अनावरण
नारळ लढवणे स्पर्धेचे खास आकर्षण असलेला विजेतेपदाचा सोन्या चांदीने मढवलेला मानाचा नारळ व सोन्याचे कॉइन, सोन्याच्या नथ तसेच अन्य बक्षिसांचे अनावरण सोमवार २८ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे.
