कुडाळ एमआयडीसीमधील परप्रांतीय कामगारांना मनसेकडून समज

कुडाळ, प्रतिनिधी
पिंगुळी गोंधयाळेवाडीमध्ये रात्रीच्या सुमारास दारूच्या शोधात फिरणाऱ्या एमआयडीसीमधील परप्रांतीय कामगारांना मनसेचे माजी कुडाळ उप तालुकाध्यक्ष दीपक गावडे आणि जगन्नाथ गावडे यांनी रात्री ८ नंतर कंपनीच्या गेटच्या बाहेर कामाशिवाय न येण्याची सक्त ताकीद देत मालक आणि मुकादमानाही देखील निर्वाणीचा इशारा दिला आहे.

त्याचप्रमाणे कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांचे आधार कार्ड आणि फोटो कुडाळ पोलीस ठाण्यात जमा करण्याचे सूचना देखील पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
या परप्रांतीय कामगारांना रात्रीच्या काळोखात १०-११ वाजता वाडीत फिरताना पकडले असून हे सर्व दारूच्या नशेत होते. याबाबत मनसे कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता एमआयडीसीमध्ये कामाला आहोत असे त्यांनी सांगितले. कुडाळ एमआयडीसीमध्ये ४०० ते ५०० परप्रांतीय काम करीत असून त्यांनी पोलिस ठाण्यात कोणत्याही पेपर जमा केलेले नाहीत. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दीपक गावडे यांनी फोन करून याची सूचना केली आहे. याबाबत योग्य कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने कारवाई करु, असा इशारा दीपक गावडे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page