रणझुंझार क्रिकेट क्लबकडून सोहळ्याचे आयोजन..
⚡दोडामार्ग,ता.२२-: सिंधुदुर्गच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या मैदानावरील बुलंद आवाज म्हणून ओळख असलेले शिरोडा येथील जेष्ठ समालोचक अशोक नाईक यांचा घोटगेवाडी येथे विशेष सन्मान करण्यात आला.
रणझुंझार क्रिकेट क्लबने या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी स्वराज्य सरपंचसेवा संघाचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, कोकण विकास संस्थेचे समन्वयक हनुमान गवस, रणझुंझार क्रिकेट क्लबचे सदस्य प्रवीण कवठणकर, उदय सातार्डेकर, अतुल कर्पे, सुजय तेली,ऋषिकेश पावसकर आदी उपस्थित होते. श्री. नाईक यांचा समालोचक म्हणून आवाज सिंधुदुर्गच्या प्रत्येक खेळाडूला क्रिडांगणावर ऊर्जा देणारा ठरत आहे. समालोचक म्हणून त्यांनी दिलेले योगदान हे टेनिस बॉल क्रिकेटसाठी महत्वपूर्ण असून त्यासाठी हा सन्मान करण्यात आला त्यांच्याच बरोबर एम. सी. ए. मान्यताप्राप्त पंच
संदीप रुद्रे (कुडाळ ), विजयी केरवाडाचे संघनायक
किशोर भगत आणि कॉम्पुटर स्कोरर अखिल परब (पेडणे) यांचाही सन्मान करण्यात आला.
