नारळ लढविणे स्पर्धेत शरफुद्दिन अथनिकर प्रथम

निखिल मेस्त्री द्वितीय: मेढा येथील गाबित वाडा मित्रमंडळाने केले होते आयोजन

मालवण दि प्रतिनिधी

मालवण मेढा येथील गाबित वाडा मित्रमंडळाच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत शरफुद्दीन अथनिकर याने प्रथम क्रमांक पटकावीला. तर निखिल मेस्त्री याने द्वितीय क्रमांक मिळविला.

नारळ लढविण्याच्या वैशिष्ट्यामुळे मालवणचा नारळी पौर्णिमा उत्सव प्रसिद्धीस पावलेला असताना दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात सांयकाळपासून रात्रौ उशिरापर्यंत नारळ लढविण्याला तरुणाईचा जोश वाढला आहे त्यामुळे मालवण मेढा येथील गाबित वाडा मित्रमंडळाच्या वतीने प्रथमच मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला

या स्पर्धेत शरफुद्दीन अथनिकर याने प्रथम क्रमांक पटकावीत २५०५ रुपयांचे पारितोषिक मिळविले तर द्वितीय विजेत्या निखिल मेस्त्री याला १५०५ रुपये असे रोख रकमचे पारितोषिक सतीश आचरेकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

यावेळी रोहन आचरेकर, आनंद आचरेकर, दर्पण सादये, रोहित जोशी, आदिनाथ खुरंदळे, सचिन साळगावकर, हर्ष मिठबावकर, कुलराज बांदेकर, ओंकार यादव, दिपेश साळगावकर, नितेश पराडकर, मिथिल हिंदळेकर व इतर उपस्थित होते.

फोटो
मालवण येथे गाबित वाडा मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत विजेत्या शरफुद्दीन अथनीकरला बक्षीस देऊन गौरविताना सतीश आचरेकर व इतर.

You cannot copy content of this page