Headlines

उद्यापासून सुरु होणाऱ्या ‘सारं काही तुझ्यासाठी’ मालिकेत झळकणार सिंधुदुर्गातील कलाकार

⚡मालवण ता.२०-: झी मराठी वाहिनीवर सोमवार दि. २१ ऑगस्ट पासून सुरु होत असलेल्या ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कलाकार झळकणार आहेत. या मालिकेच्या पहिल्या दोन भागात तसेच पुढील भागांमध्ये जिल्ह्यातील कलाकार आपला अभिनय साकारताना दिसणार आहेत.

‘सारं काही तिच्यासाठी’ या नव्या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे यांच्यासह अभिनेत्री खुशबू तावडे, शर्मिष्ठा राऊत हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील ज्येष्ठ कलाकार नमिता गावकर व निर्मला टिकम, कुडाळ येथील स्नेहल राणे, निलेश गुरव, मंजुनाथ फडके यांच्यासह इतर काही कलाकारही या मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहेत. या मालिकेच्या पहिल्या दोन भागासह पुढील भागांमध्ये झळकणार आहेत. या मालिकेचे काही भागाचे चित्रीकरण अलीकडेच वालावल येथील लक्ष्मी नारायण मंदिरात पार पडले. यात अनेक स्थानिक कलाकारांना संधी देण्यात आली.

You cannot copy content of this page