देवबाग हायस्कूलच्या मुलांचे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत घवघवीत यश…

⚡मालवण ता.२०-:
वराडकर हायस्कूल कट्टा येथे पार पडलेल्या मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत डॉक्टर दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबागच्या विद्यार्थ्यांनी बालगट आणि कनिष्ठ गट यामध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. बालगटातून दोन व कनिष्ठ गटातून एका विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

या प्रशाळेच्या कुमारी भूमी हरिहर वालावलकर ( 17 वर्षाखालील कनिष्ठ गट) द्वितीय क्रमांक :आणि
कुमार ओमकार धनंजय कुमठेकर 14 वर्षाखालील मुलगे (बालगट) तृतीय क्रमांक यांनी यश मिळविले तर कुमारी अक्षया गजानन मांजरेकर 14 वर्षाखालील मुली (बालगट) चतुर्थ क्रमांक पटकावला
सदर विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर यांनी भेटवस्तू देऊन मुलांना गौरविण्यात आले आणि त्यांना जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. बांगारे सर आणि श्री. घेवडे सर यांनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page