मसुरे विभागात युवतीसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

⚡मालवण ता.२०-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवतीसेनेतर्फे मालवण तालुक्यात पद नियुक्ती करण्याचा धडाका लावण्यात आला असून मसुरे विभागाच्या उपविभाग प्रमुख पदी प्राजक्ता प्रणय परब यांच्यासह आणखी तिघां पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवतीसेनेतर्फे मसुरा विभागातील युवतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड युवतीसेना तालुका प्रमुख सौ.निनाक्षी शिंदे आणि विभाग प्रमुख सौ. आर्या अभय गावकर यांच्या हस्ते करण्यात आल्या.

यामध्ये मसुरे शाखा प्रमुख पदी स्वरा सचिन परब, उपशाखा प्रमुख प्रज्ञा साईप्रसाद बागवे, बूथ प्रमुख पदी समीक्षा समीर बागवे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे शिवसेना महिला आघाडी तालुका समन्व्यक पूनम चव्हाण यांनी अभिनंदन करत मार्गदर्शन केले. यावेळी युवती सेना शहर प्रमुख सुर्वी लोणे, उपशहर प्रमुख माधुरी प्रभू, उपशहर प्रमुख पायल आढाव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page