निगुडेत पिकेल ते विकेल अभियान….

*💫बांदा दि.०५-:* भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोचवा यासाठी यासाठी ‘पिकेल ते विकेल’ या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून सहाय्य करण्यात आले. इन्सुली खामदेव नाका या ठिकाणी निगुडे येथील शेतकरी शर्मिला शांताराम नाईक व अरूण वासू शेगडे या दोन शेतकऱ्यांना दुकान लावण्यासाठी सहकार्य करण्यात आले. ज़िल्हा कृषी अधीक्षक म्हेत्रे, आत्माकृषी अधिकारी घोलप, उपविभागीय कृषिअधिकारी अजित अडसुळे, तालुका कृषिअधिकारी माधुरी मुटके, मंडळ कृषिअधिकारी पापडे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बचत गटाचा भाजीपाला स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरूदास गवंडे, शेर्ले सरपंच उदय धुरी, तसेच सागर निगुडकर व शेतकरी आदी उपस्थित होते. संत शिरोमणी सावतामाळी अभियानात शेर्ले कृषी सहायक्क एस.ए.बेळगुंदकर यांनी शेतकरी निवडून त्यांची शेतकरी गटांकडून भाजी विक्री व्हावी यासाठी गट तयार केले. तसेच शेतकरी विक्रेता यांना भाजी दुकान लावण्यासाठी प्रोत्साहन दिले.

You cannot copy content of this page