चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांचा 20 ऑगस्ट रोजी गुणगौरव सोहळा

⚡कणकवली ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्गच्या कणकवली शाखेतर्फे रविवार २० ऑगस्टला सकाळी १० वाजता येथील शिवशक्ती मंगल कार्यालय येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व स्नेहमेळावा आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबईतील उद्योजक संजय चव्हाण यांच्या हस्ते होईल, तर अध्यक्षस्थानी कणकवलीचे तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण असतील. मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, उद्योजक सुनील नारकर, गणेश जाधव, माजी नगरसेवक ॲड. विराज भोसले, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, कोषाध्यक्ष नामदेव जाधव, एस.टी.को-ऑप बँक कणकवली शाखा व्यवस्थापक प्रवीण म्हापणकर, माजी आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. केशव पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, जिल्हा सदस्य आनंद जाधव, मयुरी चव्हाण, मंगेश आरेकर, तालुका कार्याध्यक्ष महेंद्र चव्हाण, सचिव अविनाश चव्हाण, खजिनदार संजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या सोहळ्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page