बांदा -पत्रादेवी मार्गावरील घटना:बोलेरो चालक जखमी
⚡बांदा ता.१९-: बांदा पत्रादेवी रस्त्यावर साई मंदिर नजिक बोलेरो पिकअप व कॅन्टर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बोलेरो चालक भालचंद्र भास्कर मुळीक (वय २९, रा. वाफोली आडावाडी) हा गंभीर जखमी झाला. तर कॅन्टर चालकाला किरकोळ दुखापत झाली. हा अपघात आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झाला.
जखमीना स्थानिकांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. गंभीर जखमी असलेल्या मुळीक याला अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
