सिंधुदुर्गात प्रथमच “राग आमचे भजन तुमचे” संकल्पना : दहा भजन संघांचा सहभाग
⚡बांदा ता.१७-: पाडलोस गाव व्हॅाट्सॲप ग्रुप आयोजित श्री देव रवळनाथ मंदिर, पाडलोस येथे रविवार २० ॲागस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता “राग आमचे भजन तुमचे” या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रथमच अशी भजन स्पर्धा होत असल्याने परिसरातील सर्व भजनप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन ग्रुपचे अध्यक्ष लिंगाजी (शाणू) पाडलोसकर यांनी केले आहे.
स्पर्धेत जिल्ह्यातील निवडक दहा भजन संघांचा सहभाग आहे. श्री देवी सातेरी भजन मंडळ-सातुळी (बुवा- अमित परब), श्री गणेश भजन मंडळ-माजगाव (बुवा – कृणाल वारंग), प्राथमिक शिक्षक कलामंच-कुडाळ (बुवा – राजेश गुरव), श्री सनामदेव भजन मंडळ-सांगेली (बुवा- खेमराज सनाम), श्री लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ-जानवली (बुवा- योगेश मेस्री), श्री सिद्धेश्वर उदिन्नाथ भजन मंडळ-तळवडे (बुवा- उदय नागडे), श्री दत्त भजन मंडळ-वर्दे (बुवा- नरेंद्र मेस्री), श्री लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ-असरोंडी (बुवा – विशाल सावंत), श्री स्वरधारा भजन मंडळ-तांबोळी (बुवा – अमित तांबोळकर), श्री महापुरुष भजन मंडळ-कातवण (बुवा- सुशांत जोईल) यांचा समावेश आहे.
सर्वांच्या सहकार्यातून आयोजित या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ७००१ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय ५००१ रुपये व सनामानचिन्ह, तृतीय ३००१ रुपये व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ प्रथम १५०१ रुपये व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ द्वितीय १००१ रुपये व सन्मानचिन्ह वैयक्तिक पारितोषिके उकृष्ट गायक ५०१ व सन्मानचिन्ह, उकृष्ट हार्मोनियम ५०१ व सन्मानचिन्ह, उकृष्ट पखवाज ५०१ व सन्मानचिन्ह, उकृष्ट तबलावादक ५०१ व सन्मानचिन्ह, उकृष्ट झांजवादक ५०१ व सन्मानचिन्ह, उकृष्ट कोरस ५०१ व सन्मानचिन्ह, उकृष्ट गजर ५०१ व सन्मानचिन्ह, उकृष्ट राग सादरीकरण ५०१ व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ग्रुपचे खजिनदार राजाराम (पपी) गावडे (मो. ९४२१२६९३८४) यांच्याशी संपर्क साधावा. भजन प्रेमी, ग्रामस्थ तसेच सर्व सहकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पाडलोस गाव व्हॅाट्सॲप ग्रुपचे सचिव अमेय गावडे यांनी केले आहे.
