१७ हजारचा मुद्देमाल लंपास; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल..
⚡बांदा ता.१७-: बांदा गडगेवाडी येथे बांदा दोडामार्ग रस्त्याला लागून असलेला बंद बंगला अज्ञातने फोडून आतील इन्व्हर्टरसह एकूण १७ हजार रुपये किमतीचे सामान चोरून नेले. घर मालक देवेंद्र अनंत धामापूरकर (सध्या रा. मुंबई) यांनी आज बांदा पोलिसात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धामापूरकर हे कामानिमित्त मुंबई येथे राहतात. त्यांचा हमरस्त्याला लागून बंगला आहे. १४ ते १५ ऑगस्ट दरम्यान बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराची कडी तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. स्वच्छतागृहातील नळ, कॉक, हॅन्ड स्प्रे तसेच भांडी, इन्व्हर्टर व भांडी असा एकूण १७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने चोरून नेले.
चोरट्याने बेडरूम मधील कपाट उघडण्याचा देखील अयशस्वी प्रयत्न केला. धामापूरकर यांनी आज बांदा पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास संजय हुंबे करत आहेत.
