खासदार विनायक राऊत; गद्दारांना माफी नाही
सावंतवाडी ता..१४-:
अजित पवार यांच्यासोबत त्यांचे आमदार सरकारमध्ये आल्याने शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ झालेले आहेत त्यामुळे भविष्यात एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर माफी मागायला आल्यास आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही परंतु गद्दारांना माफी नाही असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केला. मात्र ही गळाभेट शक्य नाही परंतु यासंदर्भात सर्वस्वी निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात असेल आणि तो जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल असेही ते म्हणाले.
