बांदा-वाफोली रस्त्यावरील खड्डे बुजविले

शिवसेनेच्या प्रयत्नांना यश : पावसाळ्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी..

⚡बांदा ता.१३-: बांदा-वाफोली मार्गावरील शंकराचा पुतळा ते पाटकर पुलापर्यंतचा रस्ता वाहतुकीस जीवघेणा ठरला होता. वाफोली गावातील ज्येष्ठ शिवसैनिक(ठाकरे गट) अशोक परब यांनी वारंवार पाठपुरावा केला अन प्रयत्नांना यश आले. बांदा ग्रामपंचायतने याकडे गंभीरपणे लक्ष देत खड्डे बुजविल्याबद्दल त्यांनी आभारही मानले.


बांदा शंकराचा पुतळा ते पाटकर पुलापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली होती. या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी 2019 पासून पाठपुरावा सुरू आहे. त्यात कोकणातील सर्वात मोठा सण गणेश चतुर्थी असल्याने चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येतात. चाकरमान्यांसह येथून ये जा करणारे प्रवासी, विद्यार्थी, गावातील रुग्णांना खड्ड्यांचा नाहक त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाकडे आपण वारंवार पाठपुरावा करत राहिलो. प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्याने काहीसा धोका टळला असल्याचे वाफोलीतील ज्येष्ठ शिवसैनिक अशोक परब यांनी सांगितले.
दरम्यान, बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी तात्पुरती उपाययोजना करण्याचा दिलेला शब्द पाळल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आभार मानले व पावसाळ्यानंतर पूर्ण रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे असे आवाहन केले.

You cannot copy content of this page