ओरोस ता.१०-:राज्य शासनाच्या सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील उमेदवारांची परीक्षा १४ व १६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने सुकळवाड येथील मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट या परीक्षा केंद्रावर होणार आहे. टी सी एम या कंपनीद्वारे ही परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांचे हॉल तिकीट https://sahakarukta.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही परीक्षा निश्चित केलेल्या दोन्ही सकाळी ८.३० ते १०.३०, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत होणार आहे. उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक एम बी सांगळे यांनी केले आहे.
सहकार विभागाच्या भरतीची लेखी परीक्षा १४, १६ ऑगस्ट रोजी
