मतदान हे पवित्र कार्य आहे-नायब तहसीलदार नागेश शिंदे

आचरा हायस्कूल येथे मतदान नोंदणी व जनजागृती शिबीर संपन्न..

⚡मालवण ता.१०-: मतदान हे पवित्र कार्य आहे. प्रत्येक मतदाराने तो बजावावा असे मत मालवण तालुका निवडणूक नायब तहसिलदार नागेश शिंदे यांनी आचरा येथे व्यक्त केले.

न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काढूशे आणि मालवण तहसीलदार श्रीमती वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी
नवमतदार नोंदणी आणि मतदान जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आचरे मंडल अधिकारी अजय परब तलाठी संतोष जाधव , उपमुख्याध्यापक घुटूकडे, शिक्षक पाटील, पोलीस पाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब, कोतवाल गिरीश घाडी यांसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.या शिबिरात दोनशे नव मतदारांचे अर्ज दाखल करून घेण्यात आले.

You cannot copy content of this page