साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेवकांनकडून पथनाट्य सादरीकरण
*💫दोडामार्ग / सुमित दळवी* साटेली-भेडशी बाजारपेठेत आज क्षय रोगाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी त्यांनी दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला,तसेच ताप येणे, वजनात घट होणे,चक्कर येणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, थुंकितून रक्त येणे ही सर्व क्षय रोगाची लक्षणे सांगुन त्यांच्याकडून क्षय रोगा विषयी जनजागृती करण्यात आली. अशी क्षय रोगाची लक्षणे आढळल्यास गावातील आशा स्वयंसेविकेशी संपर्क साधावा. व आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावा असे त्यांनी पथनाट्य करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. हे पथनाट्य साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेवकांनकडून सादरीकरण करण्यात आले.
