हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांचा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा

वैभववाडी प्रतिनिधी
हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांचा स्मृतिदिन वैभववाडीत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळेत तसेच ग्रामपंचायत मध्ये स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले. तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात ही प्रतिमा पूजन करण्यात आले. येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात विविध कार्यक्रम पार पडले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. महाविद्यालयातील जवळपास 500 विद्यार्थ्यांनी रावराणे कुटुंबाला 500 अभिवादन पत्रे पाठवली.
स्मृतीदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे मित्र मंडळ, सिंधुदुर्ग रक्तमित्र प्रतिष्ठान, रोटरी क्लब वैभववाडी व राजेश पडवळ जनसेवा ट्रस्ट यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होतेे. या रक्तदान शिबिरात जवळपास 22 रक्तदात्यांनी रक्तदान केलं.

यावेळी कौस्तुभ रावराणे यांच्या परिवारातील सदस्य विजय रावराणे, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, सज्जनकाका रावराणे, रोटरीचे अध्यक्ष संजय रावराणे, उत्तम सुतार, मनोज सावंत, विद्याधर सावंत, तेजस आंबेकर, मुकुंद रावराणे, जयवंत रावराणे, प्रा. आनंद कांबळे, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page