सावंतवाडी रोटरी क्लब व डॉ. बी.एस.नाईक मेमोरियल ट्रस्टचा उपक्रम..
सावंतवाडी ९ आॕगष्ट – तळवडे येथील इंग्लिश मिडियम स्कूलच्या मागिल विस्तीर्ण पटांगणावर आज रोटरी क्लब, सावंतवाडी आणि डॉ.बी.एस्.नाईक मेमोरियल ट्रस्ट यांंच्या सयुक्त विद्यमाने 100 झाडे लावण्यात विद्यार्थी, एन.एन.एस. विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. यावेळी ट्रस्टी सी.एन्. नाईक, सौ.अस्मिता ठाकुर आणि सतिश बागवे आणि प्राचार्य अजय बांदेकर उपस्थित होते.
यावर्षी रोटरी अध्यक्ष सुहास सातोसकर यानी रोटरी इंटरनॅशनलचे एक उदिष्ट “पर्यावरण” हे मनावर घेऊ आजवर 5 वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करुन 600 रोपे लाऊन पर्याटनाला साथ दिली. यावेळी रोटरी सचिव रो.प्रविण परब, जेष्ठ रो.अनंत उचगावकर, रो.प्रमोद भागवत आणि रो.दिलीप म्हापसेकर यावेळी उपस्थित होते.

