मणेरीतील
एक किलोमीटरचा रस्ता वाहनचालकांसाठी डोकेदुखी

खड्डे बुजविण्याची मागणी;’बांधकाम’ला इशारे देऊनही रस्ता जैसे थे

⚡दोडामार्ग ता.०९-: मणेरी कलमठाणा पुलापासून मणेरी बाजारपेठेपर्यंतचा सुमारे एक किलोमीटर रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. बांदा दोडामार्ग रस्त्याचे खडीकरण,डांबरीकरण कित्येक वर्षांनी अनेक आंदोलने आणि मागण्या करून झाले; पण त्याच रस्त्याचा भाग असलेला सुमारे एक किलोमीटरचा रस्ता मात्र झाला नाही.ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला अनेक इशारे देऊनही रस्ता ‘जैसे थे’च राहिला. बांदा दोडामार्ग रस्त्याची लांबी २३ किलोमीटर आहे,त्यातील २२ किलोमीटरचा रस्ता झाला;पण एक किलोमीटरचा रस्ता मात्र वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनला आहे.

बांधकाम विभाग अपघाताची वाट बघतो काय?

मणेरी बाजारपेठेत रस्ता खचून मोठे भगदाड पडले होते.सगळ्यांनी आरडाओरड केल्यावर ते भगदाड बुजवण्यात आले.तेथे अपघात झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.बांधकाम विभाग अपघात झाल्याशिवाय ते खड्डे बुजवणार नाही का असा प्रश्न विचारला जात आहे .

You cannot copy content of this page