सिंधुदुर्ग महाविद्यालयात नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत

फ्रेशर स्पर्धेत मेगल डिसुझा व प्रथम सारंग विजेते

⚡मालवण ता.०६-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात २०२३- २४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात स्वागत समारंभ पार पडला. यावेळी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या खास मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर स्पर्धेत मिस् फ्रेशर म्हणून प्रथम वर्ष विज्ञान शाखेची मेगल डिसोजा आणि मिस्टर फ्रेशर म्हणून प्रथम वर्ष वाणिज्य शाखेचा प्रथम सारंग हे दोघे विजेते ठरले.

या समारंभात प्रारंभी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराम ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. प्रा. कैलास राबते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रथम वर्ष कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या काही विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात प्राचार्य डॉ. ठाकूर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी प्रा. डॉ. उज्वला सामंत प्रा. एच. एम. चौगुले, ग्रंथपाल संग्रामसिंह पवार, डॉ. सुमेधा नाईक, प्रा. कैलास राबते, डॉ. डी. व्ही. हारगिले, डॉ. एम. आर. खोत, प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. संकेत बेळेकर , डॉ. उर्मिला मेस्त्री यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर भार्गवी शिर्सेकर, चिन्मय तारी, वैष्णवी गावडे, ज्योती जाधव आणि मेगल डिसोजा या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मनोगते मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात यांनी केले. डॉ. उर्मिला मेस्त्री यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page