Headlines

उत्कृष्ट सेवेबद्दल युनियन बँक व कर्मचारी यांचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.०६-: गेले तीन वर्षे युनियन बँक शाखा वेंगुर्ला यांनी
दत्तमाऊली पारंपारिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशिय मंडळाला चांगल्याप्रकारे सेवा दिली. त्याबद्दल मंडळाच्या त्रैवर्ष पूर्ती सोहळ्यानिमित्त बँक अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

  यावेळी दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचे संस्था अध्यक्ष  सीताराम उर्फ बाबा मयेकर, शिवप्रसाद मेस्त्री, दत्तप्रसाद शेणई, स्वप्नील नाईक, रामचंद्र रावले, सुशांत वेंगुर्लेकर, संकेत कुडव, न्हानू कोरगांवकर, नाना केळूसकर आदी उपस्थित होते. सत्काराबद्दल व्यवस्थापक माया फलारी यांनी मंडळाचे आभार मानले.
You cannot copy content of this page