सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन मागे..

दोन महिन्याचा पगार व ईपीएफ रक्कम देण्याचे आश्वासन, राष्ट्रवादी मनसे ठाकरे शिवसेना व शिंदे शिवसेनेचा आंदोलनाला पाठिंबा..

⚡सावंतवाडी ता.०३-: येथील नगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराने दोन महिन्याचा पगार व ईपीएफ रक्कम देण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांना दिल्याने हे आंदोलन मागे घेतले आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, ठाकरे शिवसेना ,शिंदे शिवसेना, यांनी पाठिंबा दर्शवला होता.

याबाबतचे अधिक माहिती अशी की. पालिका सफाई कर्मचाऱ्यांनी दोन महिन्याचा पगार ठेकेदाराने दिला नव्हता तसेच साडेतीन वर्षाची ईपीएफ रक्कम भरली नव्हती त्यामुळे गुरुवारी सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. पालिके समोर ही आंदोलन केले. यावेळी पालिका मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी ठेकेदारा चर्चा करण्याचे आश्वासन सर्व पक्षांना दिले होते त्यानंतर सायंकाळी उशिरा ठेकेदाराने लेखी आश्वासन दिल्याने सफाई कामगारांनी तूर्तास हे आंदोलन स्थगित केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मनसे ठाकरे शिवसेना व शिंदे शिवसेना या सर्व पदाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page