⚡मालवण ता.०१-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरूजी वाचन मंदिर यांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवीन खरेदी केलेल्या पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन वाचन मंदिर येथे आयोजीत करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकार अमित खोत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी साने गुरूजी वाचन मंदिरचे अध्यक्ष रुजारिओ पिंटो, ग्रंथपाल ऋतुजा केळकर, सुधीर गोसावी, संग्राम कासले, स्नेहा साटलकर, किरण साटलकर, तुळशीदास कोयंडे, सोनाली वस्त, संजय रोगे उपस्थित होते.
यावेळी ग्रंथपाल ऋतुजा केळकर म्हणाल्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे हे ग्रंथप्रदर्शन तीन दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे वाचकांना ग्रंथालयात नवीन उलपब्ध असणाऱ्या पुस्तकांबाबत माहिती होईल व नवीन वाचक वाचन संस्कृतीशी जोडले जातील, असेही त्या म्हणाल्या. तर पत्रकार अमित खोत यांनी सेवांगणच्या सानेगुरूजी वाचन मंदिराने वाचकांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम राबविल्याचे सांगितले. संग्राम कासले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्याबद्दल माहिती सांगितली. सुत्रसंचालन व आभार ऋतुजा केळकर यांनी मानले.
