मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी च्या प्रशालेमध्ये पालक दिन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा…

⚡सावंतवाडी ता.२९-: मिलाग्रीस हायस्कूल च्या सभागृहात पालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सुरुवातीला प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रातिनिधिक स्वरूपात श्रीमती दक्षता शिंदे व श्री विजय परब या दोन पालकांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.इयत्ता पाचवी व आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमाणपत्र, भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा , उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल व पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला.
इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांप्रती आपल्या भावना नृत्य नाटिकेच्या स्वरुपात व्यक्त केल्या.विद्यार्थ्यांनी पालकांना भेटकार्ड देऊन शुभेच्छा दिल्या.भेटकार्ड देताना सुरुवातीला प्रातिनिधिक स्वरूपात दोन हिंदु , दोन ख्रिश्चन व दोन मुस्लिम विद्यार्थ्यांनी आपल्या धर्मातील प्रथेप्रमाणे व्यासपीठावर आपल्या पालकांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले.यातून मुलांना सर्वधर्मसमभावनेची जाणिव करुन दिली.
विद्यार्थ्यांमधुन कु . श्रद्धा दत्तात्रय सावंत तर पालकांमधुन श्री अनिल मगदुम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी पालकांसाठी ५स्पॉट प्रायझेस जाहिर केली व त्यांना देण्यात आली.
प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी आपले सुंदर मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री जोशी सर तर आभार प्रदर्शन प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती संध्या मुणगेकर यांनी केले.

You cannot copy content of this page