संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस काळे फासून मालवणात काँग्रेसकडून निषेध

⚡मालवण ता.२९-: राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत संभाजी भिडे यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल आज मालवणात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस काळे फासून भिडे यांचा तीव्र निषेध करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा विजय असो… निषेध असो निषेध असो, संभाजी भिडे यांचा निषेध असो… अशा घोषणाही यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.

अमरावती जिल्ह्य़ातील बडनेरा येथील एका कार्यक्रमात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अंत्यत अवमानकारक विधान करून त्यांचा अपमान केला. या वक्तव्यावरून सर्वत्र राष्ट्रीय काँग्रेस कडून संभाजी भिडे यांचा निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज मालवण भरड नाका येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला काळे फासले. तसेच भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत त्यांचा निषेध व्यक्त केला.

संभाजी भिडे यांच्या सारखी व्यक्ती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल टिका टिप्पणी करते हे संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सर्व धर्म समभाव ही आपल्या देशाची खरी ओळख आहे, परंतू ही ओळख पुसण्याचा प्रयत्न मनोहर भिडे यांच्या सारख्या मनूवादी प्रवृत्ती करत आहेत. भिडेंच्या या मनुवादी वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोत, असे यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, शहरअध्यक्ष जेम्स फर्नांडिस, बाळू अंधारी, श्रीकृष्ण तळवडेकर, संदेश कोयंडे, सरदार ताजर, आपा चव्हाण, इम्रान मुजावर, पराग मालवणकर, योगेश्वर कुर्ले, लक्ष्मीकांत परुळेकर, समीर आंगणे, मधुकर लुडबे, श्रेयस माणगावकर, गोविंद चव्हाण, बाळा चव्हाण, दिनकर मसुरकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page