⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ-: सार्वजनिक ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली पात्यक्षिक कार्यशाळा श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे पार पडली.
अलिकडेच सार्वजनिक ग्रंथालयांचे संगणकीकरण व डिजिटायझेशन या संदर्भात महाराष्ट्र राज्य स्तरावर महत्वाचे पाऊल उचलले असून या उपक्रमाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या कर्मचारी
वर्गास प्रशिक्षित करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचे द्वारे ही कार्यशाळा प्रथमच आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेचे उदघाटन संस्थेचे कार्यवाह श्री रमेश बोंद्रे व उपकार्याध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, निर्गमन सहाय्यक सौ. प्रतिभा ताटे, श्रीराम वाचन मंदिरचे ग्रंथपाल श्री महेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी डॉ. जी. ए. बुवा यांनी ग्रंथालयाचे संगणकीकरण व व्यवस्थापन प्रणालीची आवश्यकता यासंदर्भात प्राथमिक माहिती दिली. तर श्री. सचिन हजारे यांनी या प्रणालीची आवश्यकता स्पष्ट केली. तर सौ. प्रतिभा ताटे यांनी प्रत्यक्ष प्रणालीचा वापर कसा करावयाचा या बाबतचे विवेचनात्मक मार्गदर्शन केले. या प्रसंगी रमेश बोंद्रे यांनी ग्रंथालयाचे संगणकीकरण व व्यवस्थापन प्रणालीची आत्ताच्या काळात कशी आवश्यकता आहे ते स्पष्ट करून उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेस दोन्ही तालुक्यातील एकूण ३७ कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेचे संपूर्ण आयोजन श्रीराम वाचन मंदिरचे ग्रंथपाल श्री. महेंद्र पटेल व त्यांच्या पूर्ण टीमने विशेष परिश्रम घेऊन केले. या
आधुनिक प्रणालीबद्दल प्रात्यक्षिक संदर्भात उपस्थितांनी श्रीराम वाचन मंदिर व्यवस्थापनाचे
विशेष आभार व्यक्त केले.
