⚡मालवण ता.२६-: मालवण पोलीस ठाण्याचे कर्मचारी भगवान दत्तात्रय खोत यांना सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पोलीस उपनिरीक्षक पदी बढती दिली आहे. याबद्दल मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या वतीने भगवान खोत यांचा बढतीपर सत्कार करण्यात आला. यावेळी अन्य पोलीस अधिकारी व सहकारी कर्मचारी यांनीही खोत यांचे अभिनंदन केले.
भगवान दत्तात्तय खोत हे १ ऑगस्ट १९८८ रोजी आय. पी. एस अधिकारी वाय. सी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राखीव पोलिस दल, बल गट क्र. २ पुणे येथे भरती झाले. पुणे, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ गडचिरोली, दिल्ली, गुजरात या ठिकाणी कर्तव्यदक्ष चालक म्हणून कामकाज पाहिले. त्यानंतर मुंबई पोलिस दलात त्यांची बदली झाली. त्यांनी नायगाव, वरळी, ताडदेव याठिकाणी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडले. सिंधुदुर्ग पोलीस दलात बदली झाल्यानंतर त्यांनी देवगड सागरी सुरक्षा दल, निवती त्यांनंतर ओरोस येथे कर्तव्य बजावले. सध्या ते मालवण पोलिस दलात कार्यरत आहेत. या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना वरिष्ठांकडून अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
