नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांचे आवाहन
⚡सावंतवाडी ता.२६-: येथील नेत्र रुग्णालयासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला देण्यास पालिका प्रशासनाकडून चालढकलपणा होत असल्याने नॅब रुग्णालयाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाच्या विरोधात उद्या छेडण्यात येणाऱ्या जन आक्रोश आंदोलनात सामाजिक बांधिलकी मांडणाऱ्या जनतेने तसेच नॅबच्या लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी केले.
