रोटरी क्लब मालवणतर्फे शालेय समरगीत गायन स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.२५-: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन रोटरी क्लब मालवण तर्फे दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे ‘शालेय स्तरीय समरगीत गायन स्पर्धा २०२३’ आयोजीत करण्यात आली आहे. ही स्पर्धा प्राथमिक (१ ली ते ४ थी) व माध्यमिक (५ वी ते १० वी) अशा दोन गटात होणार आहे.

या स्पर्धेमध्ये एकावेळी वादकांसहीत जास्तीत जास्त १२ जणांना सहभागी होता येईल. स्पर्धेमध्ये केवळ पारंपारिक वाद्यांचा वापर करायचा आहे. सादर करण्यात येणारे गीत हे वीरपुरुष, देश, स्वातंत्र्य व क्रांतीवीरांशी निगडीत असावे. गायनाचा वेळ जास्तीत जास्त १० मिनीटांचा असणार आहे.

प्राथमिक गटातील प्रथम क्रमांक – चषक व १००० रु. द्वितीय -चषक व ७०० रु., तृतीय- चषक व ५०० रु., माध्यमिक गटात प्रथम क्रमांक -चषक व १५०० रु., द्वितीय – चषक व १००० रु., तृतीय – चषक व ७०० रु., तसेच सर्वोत्कृष्ट वादक – चषक व १००१ रु. अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. इतर सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ०२३६५ – २५२२६६ व ९४२२०७६८०५ या क्रमांकावर संपर्क साधावा, शाळेने नाव नोंदणीचे पत्र लिमये हॉस्पिटल, मालवण येथे जमा करावे, असे आवाहन रोटरी क्लब, मालवण तर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page