ग्रामस्थांनी मानले आम. नीतेश राणेंचे आभार
⚡कणकवली ता.२५-: हुंबरट- साकेडी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर पूल बांधण्यासाठी ९८ लाख १८ हजार ८९४ रुपये तर करुळ – साकेडी मार्गाच्या मजबुतीकरणासाठी २१ लाख ९५ हजार २२ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
हुंबरट – साकेडी मुख्य रस्ता ते गवाणकर घरापर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन
मधून ४ लाख ९९ हजार ८३१ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
ही कामे मंजूर व्हावीत अशी अनेक वर्षे ग्रामस्थांची मागणी होती. ही बाब लक्षात घेऊन साकेडी सरपंच सुरेश साटम व उपसरपंच प्रज्वल वर्दम व ग्रा.पं. सदस्य यांनी ही कामे मंजूर होण्यासाठी आम.नीतेश राणेचे लक्ष वेधले होते. या कामांना आम. नीतेश राणे यांनी
शासन दरबारी पाठपुरवठा करून ही कामे मंजूर करून घेतली आहेत.तिन्ही कामांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून ती पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.अशी माहिती उपसरपंच प्रज्वल वर्दंम यांनी दिली आहे.ही कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आम. नीतेश राणे यांचे आभार मानले.
