शून्यातून वर येण्यासाठी फायदा करून घेणाऱ्यांनी टीका करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे

मागील मंत्री पदाचा खरा फायदा रुपेश राऊळ यांनीच करून घेतला:
शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांचे टीकेला उत्तर

⚡सावंतवाडी ता.२५-: मंत्री म्हणून दीपक केसरकर यांचा जनतेला काहीच फायदा होत नाही असे म्हणणार्‍या रुपेश राऊळ यांनी गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात केसरकर यांचा करून घेतलेला खरा फायदा एखाद्या आकड्याच्या किती शून्यात होता याचे आत्मपरीक्षण करावे अशी टीका शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी केली.

तर दिपक केसरकर यांचा आपल्याला कितपत फायदा आहे हे जनतेला माहित आहे. जनता सुज्ञ असल्याने राऊळ यांच्या टीकेवर ती काडीमात्र विश्वास ठेवणार नाही असा विश्वासही राणे यांनी बोलतांना व्यक्त केला.


श्री राणे यांनी आज केसरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, गजा नाटेकर, विनायक सावंत, सदा कदम,संजय पालकर, एकनाथ हळदणकर आदी उपस्थित होते.

श्री राणे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत मंत्री केसरकर यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असे म्हणणे चुकीचे आहे कारण केसरकर हे अधिवेशन काळात मुंबईत असले तरी येथील परिस्थितीवर त्यांचा बारीक लक्ष आहे शासन नियमावलीत एखादी नुकसानी बसत नसल्यास केसरकर यांनी स्वखर्चातून संबंधित नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे शिवाय आपत्कालीन बैठकीमध्ये नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्या अशी सूचनाही त्यांनी केली आहे. त्याने कालच्या दौऱ्यामध्ये दुपारी 12:30 वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत आपत्कालीन परिस्थितीबाबत आढावा घेतला बांद्यासारख्या परिसरात ठीक ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली तब्बल दोन अडीच तास त्यांनी तेथील ग्रामस्थांची चर्चा करून त्यांच्या मागण्या ऐकून घेत तशा सूचना प्रशासनाला केल्या त्यामुळे राऊळ यांची टीका वायफळ आहे.


श्री राणे पुढे म्हणाले, आमदार व मंत्री म्हणून केसर करायचा जनतेला काहीच फायदा नाही असे म्हणणे चुकीचे आहे मुळात केसरकर यांचा काय फायदा आहे हे इथली जनता जाणून आहे मात्र आईच फायदा नाही अशी टीका करणाऱ्या श्री राऊळ यांनी त्यांच्या गृहराज्यमंत्री व पालकमंत्री पदाच्या काळात स्वतःसाठी करून घेतलेला फायदा आकड्याच्या किती शून्यात होता याचे आत्मपरीक्षण करावे. आज राज्याच्या मंत्रिमंडळात अभ्यास नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्यातील कार्यक्षमता पाहूनच आज दोन दोन ठिकाणचे पालकमंत्री पद त्यांच्यावर सोपवण्यात आले आहे.

मुळात दुसऱ्यावर आरोप करताना स्वतःच्या लोकप्रतिनिधी बाबत त्यांना विसर पडला असावा कारण इथल्या जनतेने निवडून दिलेले त्यांचे लोकप्रतिनिधी आपत्कालीन परिस्थितीत कुठे आहेत याचे उत्तर त्यांनी द्यावे ज्या जनतेने त्यांना मतदान केले त्यांच्या सुखदुःखाचे विचारपूस करणे त्यांचेही कर्तव्य आहे त्यामुळे दुसऱ्यावर टीका करताना रावळ याने स्वतःचा नेत्याचाही विचार करावा.

You cannot copy content of this page