⚡सावंतवाडी ता.२५-: भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसा निमित्ताने सावंतवाडी येथील आयुर्वेदीक रुग्णालय येथे रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करत तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून सावंतवाडी शहर भाजपकडून वाढदिवस उत्सवात साजरा करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, आंबोली मंडल अध्यक्ष रवि मडगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, सरचिटणीस विनोद सावंत, केतन आजगांवकर, दिलीप भालेकर, गुरु मठकर आदी उपस्थित होते.
