जुनाबाजार येथील नागरीक आक्रमक
⚡सावंतवाडी ता.२३-: मंगळवारी शहरातील जुनाबाजार येथील अश्वत्थ मारूती माठेवाडा येथील पिंपळ वृक्ष कोसळून मंदीरासमोरील पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवान यात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, झाड कोसळल्यान रस्ता बंद करण्यात आला आहे. शेजारीच जिल्हा परिषद शाळा असल्यान मुलांना याचा फटका बसत आहे.
बुधवारी सकाळी आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर यांनी याठिकाणी नगरपरिषदेची माणसं पाठवत झाड हटविण्यासाठी व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी हे काम रोखल. त्यामुळे गेले ५ दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे शाळकरी मुलांसह येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी व रहिवासी श्री बबलू मिशाळ यांसह शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्यापर्यंत रस्ता मोकळा न झाल्यास शालेय मुलांची शाळा मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात भरवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.