⚡वेंगुर्ले ता.२४-:
वेंगुर्ले शहरातील सेंटलुक्स हॉस्पीटल कंम्पाउंड मधील विहीरीमध्ये रविवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास
एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. साईश सुरेश वेंगुर्लेकर, वय ३१ वर्षे असे त्याचे नाव आहे. त्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सेंटलुक्स हॉस्पीटल कंम्पाउंड मध्ये साईश याचे घर आहे. घराच्या बाजूला असलेल्या विहिरी मध्ये मध्यरात्री त्याचा मृतदेह दिसून आला. साईश याचे मानसिक संतुलन बिघडलेले होते. दरम्यान कमलाकर आपा वेंगुर्लेकर यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास तपास पो.उपनिरीक्षक श्री.तुकाराम जाधव आणि पो.हवा चव्हाण हे करीत आहेत.